जाहिरात
दैनंदिन बातम्या

भुदान चळवळीचे नेते एकनाथ डगवार यांची गडचिरोली येथील सर्वोदय शाखेला सदिच्छा भेट

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२४ जून)

यवतमाळ येथील भुदान चळवळीचे नेते एकनाथ डगवार यांनी आधी सर्च ला पद्मभूषण डॉ. बंग दाम्पत्य व आनंद बंग यांची भेट घेऊन ते गडचिरोली येथील गडचिरोली सर्वोदय मंडळ शाखेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. श्री देवानंद कामडी व जिल्हा सचिव श्री विलास निंबोरकर यांची श्री विलास निंबोरकर यांच्या आरमोरी रोडवरील परिश्रम निवास येथे सदिच्छा भेट देऊन शाखेच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.

त्यांच्या सोबत सौ भोयर मॅडम व त्यांच्या मुलाचा मुलगा देखील सोबत होता. चहा नाश्ता आटोपून ते चामोर्शी येथील मार्कंडा देवस्थान ला भेट देऊन यवतमाळ ला परत जात असल्याचे सांगून पुढच्यावेळी भेटीत गडचिरोली येथील सर्वोदय मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी सर्वोदय मंडळाचे राज्य अध्यक्ष श्री दाणे साहेब यांच्या सोबत दौरा काढणार असल्याचे सांगितले . श्री विलास निंबोरकर यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई निंबोरकर यांच्या प्रकृतीची चौकशी करून व आशिर्वाद घेऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. जाता जाता मात्र गडचिरोली जिल्ह्याला खुषखबरी मिळेल असे एक गुपित विधान करून गेले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button