जाहिरात
गडचिरोलीविशेष

भव्य कावड यात्रेचे मार्कंडा प्रस्थान, असंख्य भाविक भक्तांचा सहभाग

Spread the love

गडचिरोली (दि,२ ऑगष्ट)

हर हर शंभू ,बम बम भोले,ओम नमः शिवाय,च्या निनादात दुमदुमले गडचिरोली शहर

सुंदरकांड मंडळ व मित्रपरिवार तर्फे आयोजित भव्य कावड यात्रा दुपारी ४ वाजता दुर्गा माता मंदिरातून विधिवत पूजाअर्चा करून मार्कंड्या साठी रवाना झाली त्यात असंख्य भाविक भक्त महिला, बाल गोपाल यांचा समावेश आहे डीजेच्या तालावर हर हर महादेव, बम भोले,ओम नम् शिवाय च्या डीजे च्या तालावर नाचत गाजत इंदिरा गांधी चौकातून सेमाना देव मार्गे प्रस्थान झाले आहे .

कावड यात्रेतील कावड पकडणाऱ्या भविकांवर पुष्पांचा वर्षाव केला जात होता.

रस्त्यात जागोजागी भव्य स्वागत व पूजा,
👇👇
जिल्हा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सतीश विधाते मेडिकलच्या समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य कावड यात्रेचे विधिवत पूजाअर्चा भगवान शंकराच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कावड यात्रा येथील सर्व सहभागी भाविक भक्तांना पिण्याचे थंड पाणी,दूध, मिठाई ,वाटप करण्यात आले .तसेच चामोर्शी रोड वरील राधे बिल्डिंग समोर काबरा कुटुंबातील सदस्यांनी कावड यात्रेचे स्वागत विधिवत पूजा व कावड यात्रेतील सर्व सहभागी यांना शुद्ध पिण्याचे पाणी व मिठाईचे पॉकेट देण्यात आले.

भव्य कावड यात्रा शहरातून मार्ग प्रस्थान करीत असताना वाहतुकीचे विशेष खबरदारी घेण्यात येत होती.कावड यात्रेतील काही सदस्य येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुकीला रस्ता करून देत होते . नियोजनबद्द कार्यक्रमामुळे कुठल्याही वाहनाला अडथळा झाला नाही.

भव्य कावड यात्रा सायंकाळच्या सुमारास चामोर्शी रोडवरील सेमाना देवस्थान येथे पोहोचली व त्याठिकाणी कावड यात्रे तील सर्व सहभागी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
महा प्रसादा नंतर कावड यात्रा मार्कंडादेव देवस्थाना करीता प्रस्थान झाली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button