जाहिरात
दैनंदिन बातम्या

“आप”च्या वतीने ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१५ ऑगस्ट)
संपादक:संदिप कांबळे

गडचिरोली येथील आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे ७६ वा ध्वजारोहण जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांचे नेतृत्वाखाली सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ओबीसी आघाडी सेलचे अध्यक्ष संतोष कोटकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर गडचिरोली शहरातील मुख्यमार्गाने तिरंगा रॅली काढण्यात आली, भारत माता की जय, वंदेमातरम, स्वतंत्र दिन चिरायू हो, अश्या घोषणा देत रेड्डी गोडाऊन मार्गे, इंदिरा गांधी चौक ते शिवाजी महाविद्यालय ते आम आदमी पार्टी जन कार्यालय कॅम्प एरिया पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.

७६ व्या ध्वजारोहण प्रसंगी जिल्हा सचिव भास्कर इंगळे, संजय जीवतोडे, दिवाकर साखरे, शहर प्रमुख नामदेव पोले, धनंजय कुसराम, मीनाक्षी खरवडे, सोनल ननावरे,हेमराज हस्ते,चोखाजी ढवले, ऍड हेमराज मेश्राम, स्वप्निल सूर्यवंशी, राकेश जुमनाके, स्वप्निल जुमनाके, डॉ सुरेश गेडाम,प्रभाकर वाकडे,अनुरथ निलेकर,पत्रूजी घोडमारे, भगवान चापले,रामदास गवारे,विश्वनाथ राजनहिरे, अनिल बाळेकरमकर,महेश बोरकर, सुधीर मेश्राम, गंगाधर ताटलवार ,साईनाथ कन्नके,खुशाल मलेलवार यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button