गडचिरोली,आरमोरी,अहेरी विधानसभा क्षेत्र काँग्रेस ला मिळावा यासाठी प्रयत्न करणार, आमदार अभिजीत वंजारी

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१८ जुलै)
विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने पूर्व विदर्भात मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे आमदार अभिजीत वंजारी यांच्यावर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या पाच जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याची जबाबदारी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला यांच्या आदेशावरून ही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे ते गडचिरोली मध्ये आज आले असता पत्रकारांशी संवाद साधताना झालेल्या कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गडचिरोली, आरमोरी व अहेरी विधानसभा क्षेत्रात स्थानिक पातळीवरील उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करीत असणार असल्याचे याप्रसंगी सुद्धा त्यांनी सांगितले. उद्या होणाऱ्या मुंबईत बैठकीत आपण तसा अहवाल सुद्धा सादर करणार अशी ही माहिती पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी याप्रसंगी दिली.
पत्रकार परिषदेला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार पेंटाराम तलांडी,शहर अध्यक्ष सतीश विधाते व सर्व विभागातील तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रकार परिषदेला हजर होते.
नक्षल प्रभावित आदिवासी बहुल व अतिदुर्गम अहेरी तालुक्यातील वडला पेठ येथे सुरजागड इस्पात प्रा. ली. स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन काल दिनांक १७ जुलैला दोन उपमुख्यमंत्री तथा उद्योग मंत्री व अन्न औषध प्रशासन मंत्री यांच्या हजेरीत झाला असल्याने खासदारांना सदर कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही दिले नसल्याने त्या कार्यक्रमाचा आज झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वांनी आपली नाराजी व्यक्त केली व राज्यातील महायुती सरकारचा निषेधही नोंदवला.
