गडचिरोली : पुन्हा घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर सुरू
तुटवड्याची शक्यता,पुरवठा विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
लोकशाही न्युज,गडचिरोली (दि ८ फेब्रुवारी)
गडचिरोली शहरात गेल्या २ महिन्याभरापूर्वी एचपी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने गंभीर स्वरूप धारण केले होते. पण त्यावेळेस पुरवठा विभागाने केलेल्या अनेक कारवायामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर सिलेंडर उपलब्ध होऊन मदत झाली होती. पुन्हा तीच परिस्थिती उदभऊ नये याकरिता पुरवठा विभागाने या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
लोकशाही न्यूज प्रतिनिधीने आज रविवार आठवडी बाजारात भ्रमंती केली असता. जवळपास ३० ते ५० व्यावसायिक घरगुती सिलेंडरचा वापर करताना दिसून आलेले आहेत.तसेच गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात सुद्धा हीच परिस्थिती कायम आहे. शहरातील नाश्त्याच्या दुकानावर हल्ली घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग होताना दिसत आहे. रविवार दिवस सुट्टीचा असल्याने व्यापारांचे फावत आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्याऐवजी झोपा घेत आहेत असे दिसते.
येत्या काळात शहरातील कुठल्याही ग्राहकाला घरगुती सिलेंडरचा तुटवडा पडू नये याकरिता पुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची फार फार गरज आहे.मागील दोन महिन्यापूर्वी सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले होते. अनेक कुटुंबांचे स्वयंपाकघर अक्षरशः बंद पडण्याची वेळ आली होती.
