जाहिरात
आपला जिल्हा

महिला काँग्रेस तर्फे हळदी कुंकू कार्यक्रम व स्नेहमीलन सोहळा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २७ जानेवारी)

दि. २५ जानेवारी २०२६रोजी गडचिरोली तालुका अध्यक्ष कल्पना नंदेश्वर तसेच सौ. शितल ठवरे यांच्यातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौ.शितल ठवरे तसेच प्रमुख पाहुणे कुसुम आलाम राष्ट्रीय समन्वयक आदिवासी काँग्रेस. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाप्रसंगी कुसुम अलाम यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच शितल ठवरे यांच्या भाषणातून महिलांना हळदी कुंकवाचे महत्त्व पटवून देऊन शब्दातून मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात उखाणे स्पर्धा अहिल्याबाई सहारे तर संगीत खुर्चीत हिना बारसागडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला या कार्यक्रमात मंजू आत्राम जिल्हा उपाध्यक्ष पौर्णिमा भडके तालुका उपाध्यक्ष गीते गोवर्धन महिला काँग्रेस कार्यकर्ता माजी नगरसेविका मीनल चिमुरकर, माजी नगरसेविका संध्या उईके विजया धुर्वे, अहिल्याबाई सहारे, वंदना बारसागडे, अर्चना जंगणवार, पौर्णिमा कुळमेथे, माधुरी हजारे, सपना मोठघरे, पुष्प चौधरी,सुनीता सेलोकर,गीता हजारे,आशा शिंद, निमगडे ताई, रामटेके ताई तसेच २०० महिला काँग्रेस हळदी कुंकू कार्यक्रमात स्नेहमीलनसोहळ्या साठी उपस्थित होत्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button