जाहिरात
क्रीडा

अप्पर-डीप्पर क्रिकेट स्पर्धेमूळे खेळाडूंना व्यासपीठ-आमदार मिलिंद नरोटे

उद्घाटनीय सामन्यात सिंहगड लॉयन्स संघाची रायगड रॉयल वर मात

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २४ जानेवारी)

आजच्या व्यस्त जीवनात प्रत्येक व्यक्तीने व्यायाम आणि खेळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अप्पर-डिपर ग्रुपने आपली परंपरा कायम ठेवत यावर्षीही क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. निरोगी राहण्यासाठी मैदानी खेळ खेळत राहणे अत्यंत गरजेचे आहे. असे मत गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले आहे.

अप्पर-डीप्पर ग्रुप च्या वतीने प्रीमियम लीग २०२६ पर्व आठवे चे उद्घाटन आज शिवाजी महाविद्यालय च्या बाजूच्या गंगुवार पटांगणावर स्पर्धेचे मोठया थाटात उदघाटन करण्यात आले आहे. स्पर्धा दि. २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत होणार आहे.

(स्पर्धेचे उद्घाटन करताना मान्यवर )

स्पर्धेच्या उदघाट्नाला अध्यक्ष म्हणुन लाभलेल्या प्रणोती सागर निंबोरकर नगराध्यक्षा न.प.गडचिरोली यांनी अप्पर डिपर ग्रुप मध्ये गडचिरोली शहरातील विविध स्तरातील व्यक्ती एकत्र खेळ करीत असल्याचे पाहून त्यांचे कौतुक केले. व त्यांच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमाला प्रमोद पिपरे भाजपा जेष्ठ नेते, निखिल चरडे, उपाध्यक्ष न. प,भोलू सोमनानी संचालक,जयसेवा इन्फ्रास्ट्रक्चर, सुनील महाडीक डीवायएसपी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी कार्यालय गडचिरोली,डॉ. यशवंत दुर्गे, सर्जन सिटी हॉस्पिटल गडचिरोली, निखिल मंडलवार संचालक जय हिंद फॅशन, अनुराग पिपरे संचालक, पिपरे पेट्रोलियम,मिलिंद उमरे अध्यक्ष प्रेस क्लब, राजूभाऊ इटनकर, संचालक आयफॉर्म, रमेश भुरसे जेष्ठ नेते,समशेर खान पठाण हे उपस्थित होते.

अप्पर डिपर व्हॉट्सअप ग्रुपतर्फे दरवर्षी जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि शासकीय कर्मचारी यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा प्रतापगड पँथर्स, सिंहगड लॉयन्स, रायगड रॉयल, शिवनेरी वॉरियर्स हे चार संघ एकमेकांशी झुंजणार आहेत. विजेत्या संघांना रोख बक्षिसे दिली जातील. उद्घाटन कार्यक्रमाला अप्पर डिपर ग्रुपच्या सदस्यांसह क्रिकेट स्पर्धेतील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रुपचे अध्यक्ष रूपराज वाकोडे यांनी केली. सूत्रसंचालन शिक्षक रमन गागापुरवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार नितेश खडसे यांनी मानले.

(मॅन ऑफ द मॅच पुरस्कार रमण सर)

आज झालेल्या उद्घाटनीय सामन्यात सिंहगड लॉयन्स संघाने रायगड रॉयल संघावर रोमहर्षक विजय संपादित केला आहे. सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रमण सर यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button