जाहिरात
राजकीय

गडचिरोली : प्रभाग क्र.१ ब सर्वसाधारण प्रवर्ग चे भाजपा उमेदवार रवि श्रीराम कांबळे यांचा वाढता प्रभाव

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२२ नोव्हेंबर)

नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून गडचिरोली प्रभाग क्र. १ ब सर्वसाधारण प्रवर्ग मधुन उमेदवारी मिळालेल्या रवि श्रीराम कांबळे यांच्या वाढत्या जनसमर्थनामुळे स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रचारमोहीमेचा वेग वाढला असून प्रभागांमधून मिळणारा प्रतिसाद हा भाजपा साठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.

प्रभागातील स्थानिक नागरिक, महिला बचतगट, युवक संघटना आणि व्यापारी वर्ग यांच्यात रवि श्रीराम कांबळे यांना भरघोस पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

प्रभागातील मूलभूत सुविधांचा विकास, स्वच्छ पाणीपुरवठा आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण यावर आम्ही ठोस काम करू, असे आश्वासन रवि श्रीराम कांबळे यांनी नुकत्याच घेतलेल्या प्रभागातील सभेत दिले. त्यांच्या या भूमिकेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भाजपाच्या गोटातही उमेदवाराच्या या वाढत्या ग्राफमुळे नवीन जोश निर्माण झाला आहे. पक्षातील कार्यकर्ते घराघरांमध्ये संपर्क मोहीम राबवत असून रवि श्रीराम कांबळे यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची कार्यशैली आणि स्थानिक प्रश्नांविषयीची जाणीव ही त्यांची मुख्य ताकद असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button