जाहिरात
क्रीडा

२६ जानेवारीला लोकप्रतिनिधी विरुध्द पत्रकार क्रिकेट सामना

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २४ जानेवारी)

स्वतंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रबोधिनी तर्फे दरवर्षी २६ जानेवारीला लोकप्रतिनिधी विरुध्द पत्रकार क्रिकेट सामना घेण्यात येत होता परंतु काही कारणास्तव हा क्रिकेट सामना बंद करण्यात आला होता. यावर्षी पत्रकार व लोकप्रतिनिधी यांच्या खास आग्रहास्तव पुन्हा क्रिकेट सामना सुरू करण्यात येणार आहे. हा क्रिकेट सामना अतिशय मनोरंजनाचा होणार आहे. सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी आपले राजकीय विचार व मतभेत बाजुला ठेवुन एका मंचावर येणार आहेत तरी सर्व नागरीकांनी, क्रिकेट प्रेमींनी शिवाजी महाविद्यालयाच्या बाजुच्या गंगूवार मैदानावर दुपारी ३ वा उपस्थित राहावे. होणाऱ्या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटावा.

या क्रिकेट सामन्यासाठी उ‌द्घाटक म्हणून गडचिरोली जिल्हयाचे सहपालक मंत्री आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी व ईतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या अतिशय मनोरंजनिय सामना पाहण्यासाठी बहुसंख्य नागरीकांनी व क्रिकेट प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, डॉ. भारत खटी, अॅड. निलकंठ भांडेकर, दत्तु माकोडे, सुधाकर पेटकर, रविंद्र भांडेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button