लोकशाही न्युज पोर्टल
आज दि.१६/४/२०२२ रोज शनिवार ला जि. प. उच्च प्राथमिक शाळा मुरमाडी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला.सर्वप्रथम गावात प्रभातफेरी काढण्यात आली
नंतर शाळा पूर्वतयारी योजना अभियान मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या मेळाव्याला शाळा ब. स. चे अध्यक्ष श्री मुरलीधर डोईजळ ,प्रमुख पाहुणे मी. रामभाऊ कोहपरे, श्री. सचिन भुसारी युवा कार्यकर्ते, श्री. शंकर चौधरी अंकुश कोहरे याऊसमधून श्री राजेश कसार, श्री. अशोक आवारी, शरद डोईजड व भरतीपात्र विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
स्वतःचे व्यक्तीमत्व व स्वतःमधील गुणाचा उपयोग प्रगती तील अडथळे दूर करण्यासाठी का करता येईल याचा शोध घेण्यासाठी व्यक्तीश: मदत करणे हे समुपदेशकाचे काम होय. समुपदेशकांचे मार्गदर्शन संशोधनपर शास्त्रीय विश्लेषणावर आधारीत असते. समुपदेशन हे विद्यार्थ्यांच्या अनेक कृतीत उपयुक्त ठरते ज्या वयात योग्य संस्कार समजायला पाहीजे. खाजगी खेडण्यावर मर्यादा मित्र मैत्रिणात होणारी तुलना ताटायला पाहीजे. यासाठी समुपदेशनाची शिक्षक भूमिका बजावित असतात. त्यांच्यावर त्यांच्या विश्वास असल्याचा चांगला सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यनमध्ये घडून येईल असे प्रास्तावविक मधून मुख्याद्यापक श्री राऊत सर यांनी पालक आणि पाल्यास समजावून सांगितले एकूण ७ स्टाल लावले होते. प्रत्येक स्टाल वर विद्यार्थ्यांची चाचपणी करण्यात आली व पालकांना समुपदेशन करण्यात येऊन विकास पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन श्री चौधरी यांनी केला आभार प्रदर्शन श्री गेडाम सर यांनी केले .
