श्री संताजी जगनाडे महाराजांच्या ४०१ व्या जयंती निमित्त ३० युवक, युवतीनी केले रक्तदान
तेली समाजाकडून नवनिर्वाचीत नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२८ डिसेंबर)
श्री संताजी जगनाडे महाराज च्या ४०१ व्या जयंती निमित्त दि. २७ डिसेंबर ला भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आला. शिबिरात ३० युवक युवतीनी रक्तदान केले. तेली समाजाच्या वतीने नवनिर्वाचीत नगराध्यक्ष ॲड सौ. प्रणोती निंबोरकर (भांडेकर), नगरसेवक अनिल कुनघाडकर, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक योगिता प्रमोद पिपरे, नगरसेवक कोमल छत्रपती नैताम, नगरसेवक शिल्पा गव्हारे (हेमके), नगरसेवक साक्षी बोलुवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सकाळी ११ वाजता कार्यालयातून श्री संताजी ची पालखी व मिरवणूक निघाली.ढोल ताशांच्या गजरात व लेझीम पथकाच्या तालावर ही रॅली गडचिरोली शहरातून प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत परत संताजी स्मृति सभागृह येथे परत पोहोचली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तेली समाजाच्या प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के,प्रा. देवानंद कामळी, अॅड. रामदास कुंघाडकर, बाबुराव कोहडे,रवींद्र निंबोरकर, राहुल भांडेकर, विकास कांबळे, महेंद्र लटारे, बालाजी भांडेकर, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे,रवीन्द्र कांबळे, संदीप कांबळे, प्रशांत कांबळे, योगेश वंजारी, रमेश कांबळे, अविनाश कायरकर, गोपीनाथ चांदेवार, विष्णूजी कांबळे,प्रफुल आंबोरकर, भैयाजी सोमनकर, कुणाल भांडेकर, घनश्याम लाकडे,भगवान ठाकरे, रवींद्र ठाकरे यांचे सहकार्य लाभले.
