जाहिरात
ताज्या घडामोडी

नोकरीच्या फसव्या जाहिरातींपासून सावध रहा!

फसव्या (Fraud) आणि बनावट (बोगस) जाहिरातींना बळी न पडण्याचे गडचिरोली जिल्हा परिषदेचे आवाहन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २२ नोव्हेंबर)

जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने सर्व सुशिक्षित बेरोजगारांना आणि नागरिकांना कळविण्यात येते की, सध्या काही समाजकंटकांकडून नोकरीसंदर्भात बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित होत आहेत. अशा फसव्या जाहिरातींवर विश्वास ठेवून आपली आर्थिक किंवा वैयक्तिक फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने खालील महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाची सूचना
!!!
जिल्हा परिषद किंवा त्याअंतर्गत येणारे कोणतेही शासकीय कार्यालय नोकरी भरती प्रक्रियेत कधीही खालील गोष्टी करत नाही.

अर्ज शुल्क म्हणून थेट पैशाची मागणी
!!!
नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी किंवा निवड निश्चित करण्यासाठी अर्जदारांकडून कोणत्याही खासगी बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जात नाही.

खासगी संपर्क माध्यमांचा वापर
!!!
नोकरीच्या जाहिरातींसाठी शासकीय संपर्क माध्यमांऐवजी केवळ खासगी किंवा वैयक्तिक मोबाईल क्रमांकांचा वापर केला जात नाही.

फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी काय करावे
!!
सत्यता तपासा नोकरीच्या कोणत्याही जाहिरातीची सत्यता फक्त आणि फक्त शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (Official Websites) तपासावी.

संशयास्पद मागण्यांकडे दुर्लक्ष करा
!!!
नोकरीच्या बदल्यात त्वरित पैसे भरण्यास सांगणाऱ्या किंवा वैयक्तिक बँक माहितीची (Bank Details) मागणी करणाऱ्या कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा संदेशांकडे त्वरित दुर्लक्ष करावे.

अधिकृत संकेतस्थळ
!!
शासकीय नोकऱ्या केवळ विहित कार्यपद्धतीनुसार आणि शासकीय प्रक्रियेद्वारे जिल्हा परिषद गडचिरोलीच्या https://zpgadchiroli.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात देऊनच भरल्या जातात.

नागरिकांनी बनावट जाहिरातींवर विश्वास न ठेवता, फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे आणि शासकीय भरतीसाठी केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button