जाहिरात
राजकीय

गडचिरोली :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,शिवसेना उद्धव ठाकरे, मनसे यांची आघाडी

अतुल गण्यारवार यांची माहिती,बिपाशा भुसारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१९ नोव्हेंबर)

गडचिरोली नगर परीषदेच्या निवडणुकीत युती, आघाडी धर्म बाजुला करून सोयीची सोबत मिळवली जात आहे. गडचिरोली नगर परीषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या तुतारीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशालीसोबत आघाडी केली आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी बिपाशा भुसारे यांना देण्यात आली असून त्या राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी मंगळवार (दि. १८) रोजी चामोर्शी रोड येथील दहीकर सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

या पत्रकार परीषदेत अतुल गण्यारपवार म्हणाले की, आमच्या आघाडीचे १८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.काही इच्छूकांना वेळेवर दस्तावेजाची पूर्तता न करता आल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही अन्यथा किमान २१ जागांवर आम्ही उमेदवार उभे केले असते. गडचिरोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पक्षाच्या एक हजार कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. तसेच मनसे आणि शिवसेना (उबाठा)चे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आहेत. हे सर्व कार्यकर्ते उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेणार असल्याचे ते म्हणाले. आघाडीकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ उमेदवार आणि शिवसेना ( उबाठा) पक्षाचे ६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिपाशा भुसारे या निवडणूक रिंगणातील सर्वांत कमी वयाच्या म्हणजे अवघ्या २२ वर्षांच्या उमेदवार आहेत. त्यांनी पुण्यात उच्च शिक्षण घेतले असून वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. तसेच मूक्या प्राण्यांची, पक्ष्यांची सेवासुश्रूषाही करतात, अशी माहिती गण्यारपवार यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. संजय ठाकरे, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, राकॉ ओबसी आघाडीचे शेमदेव चाफले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिपाशा भुसारे, नंदू कुमरे, अमोल गण्यारपवार, एजाज शेख, करण गण्यारपवार, नागनाथ भुसारे, राजेंद्र लांजेवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,शिवसेना उद्धव ठाकरे, मनसे आघाडीचे उमेदवार
!!!
नगरपरिषद अध्यक्ष _ बिपाशा नागनाथ (राजू) भुसारे

प्रभाग क्र. १)ब)प्रशांत शामराव आखाडे
प्रभाग क्र. २) अ) पवन राघो गेडाम
ब) सुनीता प्रभाकर नैताम
प्रभाग क्र. ४) अ) भावना अतुल हजारे
ब) हिमांशू विश्वासराव देशमुख
प्रभाग क्र. ५)अ) करिष्मा गजानन
भैसारे
ब) राकेश विनायक
रत्नावार
प्रभाग क्र. ६) अ) सुलभा सुभाष कावळे
ब) मंगला राजेश भट्टलवार
प्रभाग क्र. ७) अ)अपर्णा अनिल खेवले
प्रभाग क्र. ८) ब) सचिन दिवाकर
येणप्रेडीवार
प्रभाग क्र. १२) अ) आशा मुकेश मेश्राम
ब) चंद्रशेखर नरेंद्र नैताम
प्रभाग क्र. १३) अ)तुळशीराम रुषी सहारे
ब) पुजा पंकज जावादे
क)मीनाताई सुरेश बोभाटे

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button