जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली शहरात रिंग रोडचे आश्वासन अद्याप अपूर्ण

शिवसेना युवा जिल्हा अधिकारी पवन गेडाम यांचा भाजपावर आरोप

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ५ नोव्हेंबर)

गडचिरोली शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडची तातडीने आवश्यकता असल्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नंदु कुमरे विधानसभा संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा जिल्हा अधिकारी पवन गेडाम यांच्या नेतृत्वात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर थेट निशाणा साधत “गडकरी यांनी दिलेले रिंग रोडचे आश्वासन आजही अपूर्ण आहे,” असा आरोप केला आहे.

आठ वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांनी गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयात झालेल्या सभेमध्ये गडचिरोली शहरासाठी रिंग रोड उभारण्याचे सार्वजनिक आश्वासन दिले होते. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून गडचिरोलीकरांनी भाजपाच्या उमेदवाराला मत दिले आणि त्यांना निवडून दिले. मात्र, आजपर्यंत त्या रिंग रोडचे काम सुरू झालेले नाही.

युवा सेनेतर्फे या संदर्भात अनेक निवेदने संबंधित विभागांना सादर करण्यात आली, तरीदेखील त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पही अर्धवट अवस्थेत थांबले असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठमोठी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली जाते. आठ वर्षे उलटून गेली, दोन निवडणुका संपल्या, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत, तरी रिंग रोडचे काम केवळ कागदावरच आहे. गडचिरोलीकरांनी आता ‘आश्वासन नव्हे, कृती हवी अशी मागणी करावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेडाम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना थेट विनंती केली की, “नवीन आश्वासने देण्याऐवजी जुनी पूर्ण करावी आणि गडचिरोली रिंग रोडच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात करावी.”
असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नितिन गडकरी केंद्रीय मंत्री वाहतूक सडक परिवहन मंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित युवासेना उपतालुका अधिकारी गडचिरोली चेतन उरकुळे तसेच युवासेना उपतालुका अधिकारी गडचिरोली अतुल नैताम उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button