जाहिरात
राजकीय

माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरड्डीवार यांचा काँग्रेस पक्षप्रवेश

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२६ ऑक्टोबर)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गडचिरोली नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरड्डीवार हे दि. २७ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्ष प्रवेश करणार असून, त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांचा देखील मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रामराम करून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.

या भव्य काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व आमदार विजय वडेट्टिवार हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे स्थळ म्हणजे सुरेश सावकार पोरड्डीवार यांच्या घरासमोरील भव्य आवारात हा राजकीय पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार आहे.

सुरेश पोरड्डीवार यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी प्राचार्य कविता सुरेश पोरड्डीवार यांचाही काँग्रेस प्रवेश ठरणार असून, याच मेळाव्यात काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

२०१९ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत थोडक्यात पराभूत झालेल्या कविता पोरड्डीवार आता पंजा चिन्हावर उतरल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य, तर भाजपात खळबळ माजली आहे. भारतीय जनता पार्टी सुद्धा एक ते दोन दिवसात आपला नगराध्यक्ष पदाचा चेहरा घोषित करणार आहे.

स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा उत्साह उसळला आहे, आणि “गडचिरोलीत पुन्हा पोरड्डीवारांची लाट येतेय!” अशी गडचिरोली शहरात खमंग चर्चा सुरु झाल्या आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button