जाहिरात
आपला जिल्हा

गांधीनगर येथे ३५ वी क्रिकेट स्पर्धा उत्साहात सुरू

पवन गेडाम युवा सेना जिल्हाअधिकारी (उ.बा.ठा.गट) यांचे हस्ते उद्घाटन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली/चामोर्शी, (दि. २३ ऑक्टोंबर)

तरुण क्रिकेट क्लब, गांधीनगर तर्फे आयोजित वर्ष ३५ वी क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ (दि. २२ ऑक्टोंबर ) रोजी उत्साहात पार पडला.या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना(उ.बा. ठा गट) पक्षाचे युवासेना जिल्हाधिकारी पवन गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटक पवन गेडाम यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तरुणाईला एकत्र आणणारा आणि शिस्त, मैत्री व क्रीडाभाव जोपासणारा मार्ग आहे.अशा स्पर्धांमुळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि संघभावना निर्माण होते.”

स्पर्धेत परिसरातील अनेक संघ सहभागी झाले असून,
सामन्यांदरम्यान चौकार-षटकार आतिषबाजी आणि क्रीडा कौशल्य पाहायला मिळाले.कार्यक्रमाचे आयोजन तरुण क्रिकेट क्लब, गांधीनगर तर्फे यशस्वी पद्धतीने करण्यात आले.

उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व या स्पर्धेद्वारे तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत महत्त्वपूर्ण संदेश दिला.स्पर्धा अंतिम सामन्यापर्यंत रंगणार असून,गांधीनगरमध्ये क्रिकेट प्रेमींसाठी हा उत्सव आणखी काही दिवस चालणार आहे.

कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा युवासेना पदाधिकारी यांचे सह चामोर्शी ग्रामीण युवासेना तालुका अधिकारी भूषण पोरटे, गडचिरोली युवासेना तालुका अधिकारी चेतन उरकुडे,युवासेना तालुका अधिकारी मुलचेरा राहुल राय,युवासेना तालुका संघटक शहिवाल मंगल बैरागी गडचिरोली युवासेना शहर अधिकारी वैभव सातपुते,आणि गडचिरोली युवासेना उपतालुका अधिकारी अतुल नैताम सह स्थानिक नागरिक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button