जाहिरात
चिमुरनेरी

साळ्याच्या मयतीला आला अपघातात स्वतःचा जीव गमावून बसला, सिरपूर नेरी मार्गावरील घटना

Spread the love

प्रतिनिधी नेरी- प्रवीण वाघे,(दि,२६ ऑक्टोंबर)

सिरपूर नेरी मार्गावरील पूर्वी पेट्रोल पम्पच्या जवळ असलेल्या काही अंतरावर नवीन पुलाचे बांधकामासाठी खोदलेल्या पुलाच्या डबक्यात अर्धवट बांधकाम झालेल्या गड्यात एक दुचाकीस्वार दुचाकी सहित घसरून पडला असता त्याला डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
सदर असे की, दुचाकीस्वार नामे सुनील सुधाकर सिडाम अंदाजे वय 35 वर्षे राहणार जांमनी येथील रहिवासी असून दि 25 ऑक्टोबर ला हा सिरपूर येथे साळ्याच्या मयतीला आला होता साळ्याची मयत आटोपून सायंकाळी जेवण करून जांमनीला जाण्यासाठी निघाला असता अनेकांनी नातेवाईकांनी एवढ्या रात्री एकटा जाऊ नको असा आग्रह केला. तरीसुद्धा त्यांना न जुमानता एकटाच गावाकडे निघाला असता नेरीजवळील नवीन पुलाच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तोल जाऊन दुचाकी घसरली आणि तो सुद्धा डबक्यात पडला असता डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जीव गेला असावा, असा अंदाज नागरिक वर्तवित आहेत तर सदर तरुण हा पाण्यात पडून मरण पावलाअसा अंदाज वर्तविला जात आहे सदर घटनेची माहिती रात्री 9 वाजता एका चारचाकी वाहनाने सिरपूर येथे जात असलेल्या चालकाला गाडी गड्यात दिसताच माहिती झाली त्यांनी इतर लोकांना याबाबत सांगताच घटना उजेडात आली सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्रेताचे पंचनामा करून पुढील कारवाही साठी उपजिल्हारुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले.


सदर घटनेला रस्त्याची बांधकाम करणारी कंपनी जवाबदार असून मागील एक वर्षांपासून संथगतीने काम करीत असल्याने ऐका तरुणांला आपला जीव गमवावा लागला त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत पुढील तपास चिमूर चे पोलीस निरीक्षक मनोज गभने करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button