जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : १४ ऑक्टोबर रोजी साईबाबांच्या चर्मपादुकांचे आगमन

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २१ सप्टेंबर)

श्रीसाईबाबा संस्थान शिर्डी येथून साईबाबांच्या मूळ चर्मपादुकाचे १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता गडचिरोली शहरात आगमन होत आहे. दरम्यान, श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीद्वारा श्री साईपादुका रथाचे कारगील चौकात स्वागत, सकाळी ९.३० वाजता कारगील चौकातून सराफा लाइन साईमंदिर मार्केट लाइन त्रिमुर्ती चौक, दुर्गा मातामंदिर, इंदिरा गांधी चौक ते चामोर्शी मार्गावरील श्रीसाईबाबा मंदिरापर्यंत रथयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजतापासून श्रीसाईबाबा मंदिरात श्रीसाई पादुका अभिषेक व दर्शन सोहळा, दुपारी १२ वाजता मध्यान आरती व नैवेद्य, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत श्रीसाई भजनसंध्या, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्रीसाई पालखी भजनसोहळा तसेच दुपारी १२ वाजतापासून रात्री १० वाजेपर्यंत श्रीसाई मंदिर चामोर्शी रोड गडचिरोली येथे भाविकांना महाप्रसादाचे वाटप व सायंकाळी ७ वाजता धूप आरती करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरातील साई भक्तांनी सेवा अर्पण करावी असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button