जाहिरात
ताज्या घडामोडी

कंत्राटी शिक्षकांच्या कामबंद आंदोलनास अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २० सप्टेंबर)

गडचिरोली जिल्हयातील कंत्राटी शिक्षकांचे आजपासुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरू झाले असुन या आंदालनास अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने संपुर्ण पाठींबा जाहीर केला आहे. आज दुपारी ३ वाजता रिपब्किन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या कंत्राटी शिक्षकांच्या धरणे आंदोलनास भेट देऊन हा पाठींबा जाहीर केला व शासनाने सदर शिक्षकांचे गेल्या जुन महिण्यापासुन प्रलंबित असलेले मानधन तातडीने अदा करण्यात यावे अशी जोरदार मागणी केली.

मागील चार महिण्यापासुन या कंत्राटी शिक्षकांचे मानधन न मिळाल्यामुळे त्यांना अतिशय आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असुन त्यांच्या कुटुंबियांची सुध्दा उपासमार होत आहे. शिक्षणाचासारखा गंभीर प्रश्नाकडे महाराष्ट्राचे सरकार जाणुनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी बोलतांना रोहिदास राऊत यांनी केला व शासनाने आतातरी अंत न पाहता या शिक्षकांचे मानधन त्वरीत द्यावे अशी मागणी केली. येणाÚया काळात रिपब्लिकन पक्ष देखील कंत्राटी शिक्षकांच्या मागण्यांसाठी आंदोलन उभारेल असा ईशाराही यावेळी देण्यात आला.
या भेटीच्या वेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष कुलपती मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, विधानसभा अध्यक्ष प्रदिप भैसारे, युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button