जाहिरात
ताज्या घडामोडी

५ ऑगस्टला भव्य कावड यात्रेचे आयोजन

सुंदर कांड भजन मंडळाचे अभिनव उपक्रम

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २ ऑगस्ट)

संपूर्ण देशभरात श्रावण महिन्याला सुरुवात झालेली असून श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. या महिन्यात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांकडून कावड यात्रेचे आयोजन केले जाते असेच आयोजन गेल्या सहा वर्षांपासून सुंदर कांड भजन मंडळ तथा मित्र परिवार यांच्यातर्फे गडचिरोलीत करण्यात येते. यावर्षी देखील हे आयोजन ५ ऑगस्टला मंगळवारी दुपारी २ वाजता स्थानिक दुर्गा माता मंदिर येथून करण्यात आलेले आहे नदी संगमाचे पवित्र जलाची खांद्यावर कावड घेऊन गडचिरोली ते मार्कंडा ४८ किलोमीटर पायदळ कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे या कावड यात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त आपली हाजरी लावत असतात. विविध प्रकारच्या झाक्या शिवभजना सह या कावड यात्रेचे आयोजन केले जाते.

विदर्भाची काशी मानल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थान येथे आपल्या खांद्यावर पवित्र नदीचे पाणी घेऊन शिवभक्त मार्कंडेश्वर चे जलाभिषेक रुद्र पूजा करतात.
नवसाला पावणारी कावड यात्रा गेल्या सहा वर्षापासून सुंदर कांड भजन मंडळ तर्फे या कावड यात्रेचे आयोजन केले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार काही लोक आपलं नवस ठेवून या कावड यात्रेत सामील होतात व संपूर्ण भावभक्तीने गडचिरोली ते मार्कंडा यात्रा पायदळ प्रवास करत मार्कंडेश्वर चे जलाभिषेक करतात काही दिवसातच त्याने मागितले नवस पूर्ण होत आहेत. अशी अनेक उदाहरणं कावड यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविक भक्तांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता नवसाला पावणारी कावड यात्रा अशी या कावड यात्रेची खाती विदर्भात निर्माण झालेली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button