जाहिरात
आपला जिल्हा

स्थानिक गाडी मालकांकडूनच बोअर मारावे

गडचिरोली जिल्हा बोअरवेल संघटनेची पत्रकार परिषदेतून मागणी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.४ जानेवारी)

वाढती महागाई, लेबर, मटेरियल यांच्या चौपटीने वाढ झाली असल्याने गडचिरोली जिल्हा बोअरवेल संघटनेने भाव वाढवून आपला व्यवसाय करावा. व जिल्ह्यातील सर्व बोअर मारणाऱ्या लोकांनी स्थानिक बोअरवेल मालकाकडूनच आपल्या शेतात व घरात बोअर मारावे अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.आज (दि.४ जानेवारी) ला झालेल्या देवकुले प्रांगणात झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

(पत्रकार परिषदेत माहिती देताना बोअरवेल संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते )

बोअर चे काम लहान गाडीने ८० रुपये प्रती फूट ने करावे व मोठया गाडीने १२० रुपये प्रती फुट ने काम करावे. जेणेकरून बोअरच्या गाडीवर काम करणाऱ्या मजुराचे उदरनिर्वाह सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल.

परप्रांतीय (आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू) गाडी मालकाकडून बोर चे काम करू नये. त्यांच्या कामाची गुणवत्ता खूपच खराब असते अशीही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

गाडी मालक हा साधारणतः लहान गाडी घेताना किमान एक करोड रुपयाची ची गुंतवणूक करतो. व मोठी गाडी मालक दोन करोड रुपयाची गुंतवणूक करतो. कोणी बँक वर फायनान्स करतो तर कोणी शेती विकून आपली गाडी घेतो.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला गडचिरोली जिल्हा बोअरवेल संघटनेचे अध्यक्ष महेश उके, सचिव गौरव देशमुख, कोषाध्यक्ष राकेश रत्नावार, उपाध्यक्ष चामोर्शी संदीप गडे, उपाध्यक्ष धानोरा/ आरमोरी शकील पठाण, उपाध्यक्ष आष्टी प्रमोद पुण्य पवार, उत्तम बारई, सुकुमार मंडल, बंडू भांडेकर, उपाध्यक्ष एटापल्ली /भामरागड देवराव राहील यांचे सह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button