जाहिरात
आपला जिल्हा

लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात सामान्य प्रसूतीद्वारे जन्मले ४.६३ किलो वजनाचे बाळ

Spread the love

लोकशाही न्युज,कोनसरी (दि. २९ जुलै)

गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाची वैद्यकीय क्षमता आणि आरोग्यसेवेतील उत्कृष्टता अधोरेखित करणाऱ्या घटनेत ४.६३ किलो वजनाचे बाळ रुग्णालयात सामान्य प्रसूतीद्वारे जन्मले. बाळ आणि आई दोघेही सुरक्षित आहेत.

गडचिरोली भागातील हा सर्वात जास्त वजनाच्या बाळाचा सामान्य प्रसूतीद्वारे झालेला जन्म असू शकतो. सामान्यत: ४ किलो आणि त्याहून अधिक वजनाची बाळे ‘मोठी’ मानली जातात. या प्रकरणात, बाळाचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथील सुंदर नगर येथील रहिवासी असलेल्या एका मधुमेह नसलेल्या आईच्या पोटी झाला. २७ जुलै २०२५ रोजी लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात आईने ह्या बाळाला जन्म दिला. सिझेरियन सेक्शन किंवा एपिसिओटॉमी न करता बाळाचा सुरक्षित जन्म झाला.

आई आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. एलकेएएम रुग्णालयामधील डॉक्टरांच्या मते, ‘शोल्डर डायस्टोसिया’ (बाळंतपणात गर्भाचा खांदा मातेच्या श्रोणिमध्ये अडकणे, ज्यामुळे बाळाला बाहेर येण्यास अडचणी निर्माण होतात) परिस्थिती असतानाही रुग्णालयाच्या तज्ञ चमूने प्रसूती यशस्वीरित्या पार पाडली. ह्यातून माता व बाळ सेवेतील उत्कृष्टतेसाठी रुग्णालयाची वचनबद्धता अधोरेखित होते तसेच गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही रुग्णालयाची वैद्यकीय क्षमता दर्शवते. सदर बाळाचा जन्म गडचिरोली भागातील सर्वात अधिक वजनाच्या बाळाच्या सामान्य प्रसूतीद्वारे झालेल्या जन्मांपैकी एक असू शकतो.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button