जाहिरात
पत्रकार परिषद

छत्तीसगड सीमेवर चकमक ४ नक्षली ठार

एस पी ची पत्रकार परिषदेतून माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/भामरागड (दि. २३ मे)

महाराष्ट्र–छत्तीसगड सिमेवर उपविभाग भामरागड अंतर्गत नुकतेच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे हद्दीत विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने काही नक्षली एकत्र येऊन दबा धरुन बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या १२ तुकड्या व सिआरपीएफ ११३ बटालियन डी कंपनीची १ तुकडी दि.२२ मे ला दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात नक्षलवाद विरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आले होते.

पोलीस अभियान तुकड्या जंगल परिसरात पोहचून दि.२३ मे रोजी सकाळी ७ वाजता च्या सुमारास पोलीस पथकातील जवान जंगल परिसरात घेराबंदी करुन शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला.

पोलीस जवानांनी प्रत्युत्तर व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.सुमारे ३ तास चाललेल्या चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर २ पुरुष व २ महिलाचे मृतदेह आढळून आले.

मृतक नक्षल्यांची नाव
!!!
१. सन्नु मासा पुंगाटी वय ३५ वर्षे,रा. कवंडे ता.भामरागड जि. गडचिरोली
२. अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे, वय ३८ वर्षे, रा. कवंडे ता. भामरागड, जि.गडचिरोली
३. विज्यो ऊर्फ विज्यो होयामी, वय २५ वर्षे, रा. पोडीया, गंगालूर एरीया (छ.ग.)
४. करुणा ऊर्फ ममीता ऊर्फ तुनी पांडू वरसे, वय २१ वर्षे,
रा. गोंगवाडा ता. भामरागड, जि. गडचिरोली
वरील मृतका वर अनेक चकमक, जाळपोळ व खुन इ. वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

घटनास्थळा वरून पोलिसांनी हस्तगत केलेले साहित्य
!!!
एस.एल.आर दोन ३०३ रायफल व एक भरमार असे एकूण ४ अग्निशस्त्र, वॉकीटॉकी, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य

पत्रकार परिषदेला पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button