
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. २२ मे)
गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील स्वराज्य हेल्थ क्लब च्या बाजूला व नवीन रेल्वे स्थानकानजिक असलेल्या लाखो रुपये खर्चून तयार झालेल्या हवा भरलेल्या वातानुकूलित सिनेमागृहाला शुभारंभ चा आज मुहूर्त मिळाला. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते सिनेमा गृहाचे उद्घाटन करण्यात आले. कोरोना काळापासून सिनेमागृहाचे कामकाज सुरू झाले होते ते आज पूर्णत्वास आले.व सिनेमागृह सुरु झाले.
सिनेमगृहाचा शुभारंभ लांबणीवर गेल्याने सिनेमा रसिकांची नक्कीच नाराजी होती पण आज सिनेमागृहाचे शुभारंभ झाल्याने ती नाराजी पण दूर झाल्याचे दिसत आहे.
गडचिरोली शहरात एकमेव भव्य अशा वातानुकूलित सिनेमागृहामध्ये दर्शकांची संख्या जवळपास १२० असणार आहे. तिकीट दर १००, १५०, २०० रुपये असणार आहे. सिनेमागृहाच्या बाजूला भव्य चारचाकी व दुचाकी वाहनासाठी पार्किंगची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे.
गडचिरोली शहरात पूर्वीपासूनच दोन सिनेमागृह आहेत पण दर्शकाच्या नाराजीमुळे त्या सिनेमागृहाकडे दर्शकांनी पाठ फिरवली आहे. नुकत्याच सुरु झालेल्या वातानुकुलीत सिनेमागृहात लोक किती पसंती देतात हे पाहण्यासारखे आहे गडचिरोलीची जनता वातानुकूलित अशा भव्य सिनेमागृहात सिनेमा पाहण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते.
