जाहिरात
आपला जिल्हा

माजी जि. प. सदस्य शिल्पा धर्मा रॉय ने बळकावली संयुक्त खरेदी केलेली मालमत्ता

पिडीतांची पत्रकार परिषदेतून माहिती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली /अहेरी (दि. २६ डिसेंबर)

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत अलापल्ली येथील घर क्रमांक ५०३ ही मालमत्ता नितेश येमुलवार व माजी जि. प. सदस्य शिल्पा रॉय यांनी सन २०१८ संयुक्तपणे विकत घेतली होती मात्र त्यावेळी ग्रामपंचायत मध्ये सदर खरेदी विक्रीची नोंद करण्यात आली नाही.संयुक्तपणे त्या जागेची खरेदी विक्री नोटरी नियमानुसार एडवोकेट जैनवार यांच्या मार्फत करण्यात आली होती. या व्यवहारातील मूळ कागदपत्र माजी जि. प. सदस्य शिल्पा धर्मा रॉय आहे यांच्याकडे होती व दुय्यम प्रत माझ्याकडे होती.

या परिस्थितीचा गैरफायदा घेत शिल्पा रॉय यांनी २०१८ च्या जुन्या स्टॅम्प पेपर वरून खोटी झेरॉक्स परत तयार करून त्यामधून माझे नाव काढून टाकले व स्वतःच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्या कागदपत्राच्या आधारे ग्रामपंचायत आलापल्ली येथे बेकायदेशीर नोंदी करून घेण्यात आल्या.मी अपघात ग्रस्त असून बेडरेस्टवर असल्याने मला याची साधी जाणीवही झाली नाही.सप्टेंबर २०२५ मध्ये सदर मालमत्ता क्र. ५०३ ही एकतर्फी विक्रीस काढल्याचे मला समजताच माझी फसवणूक झाले असे वाटले.

झालेल्या फसवणुकीची माहिती आज (दि.२५ डिसेंबर) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नितेश येमुलवार व त्यांच्या पत्नी राजश्री येमुलवार यांनी दिली व न्यायासाठी न्यायालयाचे दार ठोठावणार अशीही माहिती त्यांनी दिली .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button