जाहिरात
क्राईम

ग्रामसेविकेने अमिर्झा ग्रामपंचायत कार्यालयातुन सरपंचांच्या मदतीने ५ एच.पी.पावरच्या २ मोटारी चोरी केल्याची तक्रार

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १८ मार्च)

गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अमिर्झा ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामविकास अधिकारी कु.वासंती देशमुख यांनी तेथील सरपंच सोनाली गोकुलदास नागापुरे यांच्या मदतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या स्टोअर रूम मधून दोन ५ एचपी पावरच्या मोटारी चोरून नेल्याची तक्रार ग्रामपंचायत येथील उपसरपंच संदीप भैसारे, सदस्य अजय नागपुरे, सदस्य पंढरी चौके आमिर्झा यांनी दि. १८ मार्च रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना तक्रार केली आहे.

ग्रामसेविका कु. वासंती देशमुख व सरपंच सोनाली नागपुरे यां दोघांच्या संगणमताने चोरी केल्याची तक्रार गुरुवार दि. १४ मार्च ला गडचिरोली पोलीस स्टेशनला दिलेली होती पण तक्रारीच्या अनुषंगाने कुठलीही चौकशी न झाल्याने त्या तक्रारीचे संदर्भ देऊन पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे .

अमिर्झा ग्रामपंचायत कार्यालयातील स्टोअर रूममधून चोरी गेलेल्या मोटारी व शासकीय मालमत्तेची अफरातफर करणाऱ्या संबंधित आरोपीवर फौजदारी कारवाही करण्याची मागणी सुद्धा तक्रारीत केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button