१०० हुन अधिक पत्रकारांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२० फेब्रुवारी)
मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या आरोग्य तपासणी शिबिरात १०० हून अधिक पत्रकारांनी व त्यांच्या कुटुंबीयातील सभासदांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
आज झालेल्या आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रमाचे उदघाटक डॉ. सतिश सोळंके यांचे हस्ते तर जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उदघाटन मराठी पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हा सामान्य रुग्णालय ओपीडी गडचिरोली येथे पार पडला. या शिबिरात १०० हुन अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबियाची आरोग्य तपासणी शुगर, बिपी, इसिजी, रक्त तपासणी सीबीसी, कान, नाक,घसा, इत्यादींची तपासणी करण्यात आली.व त्यांना औषधोपचार ही देण्यात आला.
सदर आरोग्य तपासणीत पत्रकार अविनाश भांडेकर, रोहिदास राऊत, रुपराज वाकोडे, सुरेश नगराळे, मिलिंद उमरे, मनोज ताजने, संदिप कांबळे, आशिष अग्रवाल, मनीष रक्षमवार, संजय टिपाले, सुमित पाकलवार, फिरोज लालानी, उदय धकाते, व्यंकटेश दुडमवार, जगदिश कन्नाके ,राजेश खोब्रागडे, प्रा. मुनिश्वर बोरकर, मुकुंद जोशी, श्रावण वाकोडे , प्रविण चन्नावार , अनुप मेश्राम, रेखा वंजारी, तिलोत्तमा हाजरा, सहीत बहुसंख्य पत्रकारांनी व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील महादेव बसेना,वामन खंडाइत,गुरुदास गेडाम, दिनेश वरखडे यांनी सुद्धा आरोग्य तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनीष मेश्राम, डॉ. जितेंद्र डोलारे, डॉ. मृणाली रामटेके, डॉ. मुकुंद डभाले, डॉ. अजय कांबळे, डॉ. बाळू सहारे, रोहण कुमरे, माणिक मानसपुरे, डॉ. शान गोंडा, अधिपरिचरिका आशा बावणे, प्रणाली ठेंगणे, शिल्पा मेश्राम, शिल्पा सरकार, वैशाली बोबाटे, शितल काळबांधे, प्रयोगशाळा सहाय्यक रोशनी सिंग आदींनी विशेष सहकार्य केले.
