जाहिरात
ताज्या घडामोडी

अवैध रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.९ फेब्रुवारी)

गडचिरोली जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी पंडा यांनी वाळू तस्करांच्या विरोधात एल्गार पुकारला याच पार्श्वभूमीवर रविवार सकाळच्या सुमारास गडचिरोली शहरालगत असलेल्या कठाणी नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी रेती वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार चंदू प्रधान यांनी घटनास्थळी पोहोचून चालक सचिन पोहनकर नामक ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३३ जी ११०७ रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्यालयात जप्त केले आहे.

जिल्हाधिकारी रेती तस्करा विरोधाच्या नव्या धोरणानुसार अवैध रेती उत्खनन आळा घालण्याकरिता सकाळच्या सुमारास कठाणी नदीतील घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती देण्यात आली होती. त्यानुसार महसूल विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाईत रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त केल्याची घटना घडली आहे. ही कारवाई ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील हिरो शोरूम लझेंडा येथे स्थानिक महसूल विभागाने केली आहे.

पोलिसांनी रेतीसह पकडलेल्या ट्रॅक्टरच्या कारवाईत ट्रॅक्टर चालकासह ३ हमाल मजुरांविरुद्ध गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला, तर स्थानिक महसूल प्रशासन अंतर्गत केलेल्या कारवाईत रेतीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास कठानी नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार चंदू प्रधान यांनी घटनास्थळी पोहोचून ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३३ जी ११०७ रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर गडचिरोली तहसील कार्यालयात जप्त करून ट्रॅक्टर चालकासह ट्रॅक्टर मालक नामदेव नैताम लांजेडा विरोधात गुन्हा नोंद केला आहे. रात्रीच्या सुमारास होतेय तस्करी – मागील काही दिवसांपासून गडचिरोली तालुक्यातील कठाणी व गुरवळा नदी वैनगंगा नदी घाटातून रात्रीच्या सुमारास रेती तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाद्वारे रेती चोरीप्रकरणी केलेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button