जाहिरात
क्रीडा

उद्यापासून गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ला सुरुवात

प्रेक्षकांना मोफत बस, टी -शर्ट व नाश्त्याची सोय

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.४ फेब्रुवारी)

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने येत्या ५ फेब्रुवारीपासून गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) स्पर्धा आयोजित करण्यात आली असून बुधवारला सुप्रसिद्ध क्रिकेटर रवी शास्त्री यांचे शुभहस्ते स्पर्धेला सुरुवात होत आहे. क्रीडांगणावर पोहचण्यासाठी प्रेक्षकांना बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच वेळेपूर्वी पोहचणाऱ्या प्रेक्षकांना टी शर्ट आणि भरपेट नाश्ताही देण्यात येणार आहे.

गडचिरोली येथील एमआयडीसी (MIDC) मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ५ फेब्रुवारीला दुपारी ३:३० वाजता भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. रवी शास्त्री यांना सन्मानित केल्यानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा मार्च पास्ट होणार आहे. यावेळी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.

दुपारी ३ वाजतापूर्वी आत येणाऱ्या प्रेक्षकांना टी शर्ट आणि नाश्ता देण्यात येणार आहे. शिवाय एमआयडीसी मैदानावर पोहचण्यासाठी गडचिरोली येथील राधे बिल्डींग समोरुन, बस डेपो, इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह,आयटीआय चौक, न्यायालय परिसर या ठिकाणांहून मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिकेटप्रेमींनी हा ऐतिहासीक सोहळा आणि सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बलराम भोलू सोमनानी यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button