जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : रोटरी उत्सव २०२५ चे उत्साहात उदघाटन

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि १६ जानेवारी)

रोटरी उत्सव २०२५ चे आयोजन गडचिरोली येथे उत्साहाने करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष म्हणून रोटरी क्लबचे सुनिल बट्टूवार उपस्थित होते.विशेष अतिथी म्हणून लॉर्ड्स मेटलचे रेसिडेंट डायरेक्टर विक्रम मेहता तथा रोटरी क्लबचे विद्यमान सचिव विश्राम होकम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे हास्य कवी संमेलन हे होते. देशातील विविध राज्यातून उच्च दर्जाचे हास्यकवी येथे आलेले होते. राजस्थान इथून सुमित्रा सरल ,हरियाणा चे यशदीप कौशिक महाराष्ट्रातील कपिल जैन ,उत्तर प्रदेशातील देवेंद्र प्रताप आग ,आंध्र प्रदेशातील मनोज मद्रासी ,हरियाणातील संजय बंसल तर मध्य प्रदेश मधून कामता माखन अशा ख्यातीच्या कवींनी आपल्या कविता सादर करून गडचिरोली वासियांना मंत्रमुग्ध करून टाकलं व हसवून हसवून वेगळ्या आनंदाची पर्वणीच घेऊन आले.

या उत्सवात दिनांक १६ जानेवारी ते २० जानेवारी या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि सामूहिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. शहरवासीयांनी विविध स्पर्धांमध्ये हीरिरीने सहभागी व्हावे असे आवाहन. रोटरी क्लब ने केलेले आहे.

डॉ. प्रशांत बोकारे यांनी आपल्या उद्घाटन भाषणात रोटरी क्लबच्या सामाजिक उपक्रमांबद्दल गौरवोद्गार काढत, समाजाच्या विकासासाठी रोटरी क्लबने केलेल्या कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल बट्टूवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, “रोटरी उत्सव हा समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणारा आणि सामाजिक सलोख्याला प्रोत्साहन देणारा मंच आहे,” असे सांगून या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

कार्यक्रमाला गडचिरोलीचे माजी व शहराचे पहिले नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार तसेच माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, रोटरी क्लबचे चार्टर्ड प्रेसिडेंट दिवाकर बारसागडे, शहरातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर राजूभाऊ मुनघाटे , रोटरियन हेमंत राठी , रोटरियन अमित सूचक, रोटरियन नीरज जैन, इनर व्हील च्या अध्यक्षा प्रतिभा रामटेके मॅडम इत्यादी उपस्थित होते . सोबतच गडचिरोलीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक, रोटरी क्लबचे सदस्य, इन्नर व्हीलचे समस्त सदस्य विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर राकेश चडगुलवार तर आभार सतीश त्रिनगरीवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवर व आयोजकांचे आभार मानण्यात आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button