जाहिरात
ताज्या घडामोडी

शासकीय धान खरेदी केंद्रातील शेतकऱ्यांना धानाचे हप्ते तात्काळ द्या : खासदार किरसान

अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१६ जानेवारी)

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र अतिदुर्गम मागास क्षेत्र असून लोकसभा क्षेत्रातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीव्यतिरिक्त दुसरा कुठलाही मोठा उत्पादनाचा माध्यम त्यांच्या जवळ नाही, विविध बँक आणि इतर माध्यमातून शेतकरी कर्ज घेऊन शेती करतात, मात्र शेतीचे पीक निघून धान विकल्या नंतरही अद्याप अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीचा मोबदला मिळाले नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर शासनाकडून पैसे येण्यास उशिर होत असल्याने आम्ही काही करू शकत नाही अशी उत्तरे दिल्या जात आहे, ह्या सर्व प्रक्रियेत शेतकऱ्यांना आपल्याच हक्काच्या पैसा साठी तात्काळत राहावे लागत आहे , त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या धानाचा मोबदला तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे.

जर शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना विकलेल्या धानाचे हप्ते देण्यास विलंब होत असेल तर शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिला आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button