जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : महाराजा चषक क्रिकेट स्पर्धा ठरतंय वादग्रस्त

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे मोठा राडा ; शेकडो खेळाडू व नागरिक नाराज

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१३ जानेवारी)

कोणतेही क्रीडा स्पर्धा हे सर्वांगिक विकासासाठी महत्त्वाचा भाग आहे या उद्देशाने संपूर्ण जिल्ह्याभरात विविध संघटनेतर्फे क्रिकेट खेळाच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात मात्र गडचिरोलीत सुरू असलेले महाराजा क्रिकेट चषक हे पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे चांगलेच वादग्रस्त ठरलेले आहे. खेळ असो किंवा सामाजिक जीवनातील भाग असो यात पंचांची भूमिका महत्त्वाची असते मात्र पंच जर एखाद्या संघाला झुकते माप देऊन पुढच्या संघाला च्या विरोधात चुकीची निर्णय वारंवार देत असतील तर ही क्रीडा स्पर्धा कशासाठी आयोजित करण्यात आलेली आहे असा सवाल आता महाराजा चषक मध्ये खेळण्याकरता आलेल्या खेळाडूंनी तसेच प्रेक्षकांनी केला आहे.

असेच काही आज दिनांक १२ जानेवारी २०२५ ला सामन्यात घडले . प्राप्त माहितीनुसार शिवानी इलेव्हन संघ व अप्पर डिप्पर संघाच्या सुरू असताना आपल्या विरोधात पंचांनी चुकीचा निर्णय दिला याकरिता अप्पर डिप्पर संघाने आवाज उचलत महाराजा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजक मंडळातील पदाधिकाऱ्यांकडे दाद मागली मात्र ही दाद फेटाळून आयोजक मंडळातील पदाधिकारी पोलीस यंत्रणाचा दबाव दाखवणे सुरू केले मात्र हा सामना प्रत्यक्ष बघणाऱ्या प्रेक्षकांनी तसेच अप्परडीपर संघाच्या समर्थकांनी जोरदार आवाज उचलत आपली बाजू मांडल्यामुळे सामना रद्द करण्यात आला व मंडळातर्फे सामन्याचा निर्णय उद्या ४ वाजता देण्यात येईल असे सांगितले त्यामुळे आता महाराजा चषक क्रिकेट स्पर्धा चांगलीच चर्चेचा विषय ठरलेली आहे त तसेच यावेळी सिरोंचा येथील खेळाडूंनी देखील आपल्यावर देखील असाच अन्याय झाल्याची कबुली करत महाराजा चषक क्रिकेट स्पर्धेवर आमच्याबरोबर अन्याय केल्याचा आरोप देखील लावला पंच हे फक्त शिवानी इलेव्हन संघ संघाच्या बाजूने निर्णय देतात असा देखील आरोप यावेळी मातोश्री संघातील खेळाडू व समर्थकांनी केला क्रीडा स्पर्धा ही सर्वांगीण विकासासाठी असते मात्र या महाराजा चषक क्रिकेट स्पर्धेत असे कुठेही दिसून आलेले नाही.

सदर क्रीडा स्पर्धेला परवानगी मिळालीच कशी
¶¶¶
महाराजा चषक क्रिकेट स्पर्धा खेळण्यात येणाऱ्या मैदान हा शासकीय यंत्रणेनुसार रेड झोन मध्ये आहे या जागेवर कलेक्टरचा शेरा आहे व यात स्पष्टपणे नमूद आहे की सदर जागा आहे हस्तांतरण तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय उपयोगात आणता येणार नाही मग या अशासकीय क्रिकेट स्पर्धेकरिता परवानगी मिळाली कशी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अशासकीय कार्यक्रम व स्पर्धा घेता येत नाही मात्र या मैदानाची परवानगी प्रशासनाने दिलीस कशी असा सवाल देखील यावेळी आलेल्या नागरिकांकडून करण्यात आला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत देखील चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.

रात्रभर सुरू असतात क्रिकेट सामने
¶¶¶
डीजे व लाऊड स्पीकर ची परवानगी ही रात्रीच्या दहा वाजेपर्यंत असते मात्र महाराजा चषक या क्रिकेट स्पर्धेत रात्रभर क्रिकेट सामने सुरू असल्यामुळे डीजे व लाऊड स्पीकर सुरू असतो त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच या परिसरात वाचनालय देखील आहेत तसेच मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे निवासस्थान आहेत रात्री दहा वाजताच्या नंतर डीजे व लाऊड स्पीकर ला परवानगी देऊ नये अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली .

मैदानात वाकी टाकी वापरण्याची परवानगी कशी काय
¶¶¶
गडचिरोली जिल्हा हा जिल्हा नक्षल प्रभावित असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने वाकी टॉकी या यंत्रणेचा वापर पोलीस प्रशासनाच्या परवानगी शिवाय करता येत नाही मग महाराजा क्रिकेट स्पर्धेत वाकी टाकीचा उपयोग सारसपणे कसा केला जात आहे. त्यामुळे महाराजा चषक क्रिकेट स्पर्धा रद्द करून आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

अविष्यांत पंडा
जिल्हाधिकारी, गडचिरोली
¶¶¶

मी नवीन असल्याने त्या विषयी माहिती मला नाही मी माहिती घेऊन आपणास सांगतो. अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी यांनी लोकशाही न्यूज ला दिली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button