येनापूर येथील नवीन शाळा इमारतीचे सुरू केलेले बांधकाम रद्द करून सुरक्षित जागेवर करा
येनापुर ग्रामस्थांची पत्रकार परिषदेतून मागणी

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि,७ जानेवारी)
चामोर्शी तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा गट ग्रामपंचायत सोमनपल्ली अंतर्गत मौजा येनापुर जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम मंजूर झाले असल्याने ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी पाच महिन्यापूर्वी सरपंच यांनी वन विभागाच्या दुर्गापूर हद्दीमध्ये तलावाच्या पोटात खोदकाम केलेले होते. त्यावेळी सुद्धा गावकऱ्यांनी तलावाच्या पोटात इमारतीचे बांधकाम करण्यास विरोध करून बांधकाम थांबवले होते परंतु त्याच ठिकाणी तलावाच्या पोटात मागील बांधकाम केलेल्या जागेच्याच बाजूला परत त्याच ठिकाणी बांधकामाला सुरुवात केलेली आहे ते बांधकाम तात्काळ रद्द करण्यात यावे व सुरक्षित जागी ते बांधकाम करावे अशी मागणी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून येनापुर ग्रामस्थांनी केलेली आहे.

(तलावाच्या पोटात सुरू झालेले बांधकाम)
सदर शाळा इमारतीचे तलावाच्या पोटात बांधकाम केल्यास तलावात पाणी असल्याने ती जागा दलदलीची झालेली आहे इमारतीच्या बांधकामास सुद्धा त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होऊ नये व मुलांच्या जीवास धोका होऊ नये याकरिता ती शाळा तिथे न बांधता योग्य त्या ठिकाणी बांधण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला सुरेश गुंतीवार, राजू येगोलपवार, किशोर गोपवार, हनोजी कन्नाके, शांताराम कुमरे,मोहन बंडावर यांच्यासह अनेक ग्रामस्थ हजर होते.
