जनकल्याण प्रतिष्ठान च्या सचिवपदी शिवरामजी कुमरे यांची नियुक्ती

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.५ जानेवारी)
जनकल्याण प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या सचिवपदी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता व सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक श्री शिवरामजी कुमरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवरामजी कुमरे गेल्या अनेक वर्षापासून विविध संघटनांच्या माध्यमातून आदिवासी, शेतकरी, कामगार व विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत. जनकल्याण प्रतिष्ठान चे कार्य जोमाने पुढे नेण्यासाठी जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी ही नियुक्ती केली आहे.
२००५ मध्ये जनकल्याण प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली. शांतता व विकासाच्या मार्गाने नक्षलवाद संपुष्टात येईल अशी संकल्पना पोलीस व जिल्हा प्रशासनासमोर मांडण्यात आली. त्यावेळचे पोलीस अधिक्षक शिरीष जैन यांच्या पुढाकारातून गडचिरोली वडसा व अन्य शहरात शांतता रॕली काढण्यात आल्या व ग्रामीण भागात जनजागरण मेळावे आयोजित करण्यात आले. जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे सुरेश पद्मशाली, व अन्य सदस्यांनी नक्षलवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले.
जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदनही शासनाकडे पाठविले होते.कोरोना काळात जनकल्याण प्रतिष्ठान चे कार्य मंदावले होते. आता नव्या जोमाने जनकल्याण प्रतिष्ठान चे कार्य नव्या कार्यकर्त्यांसह सुरू करण्यात येत आहे. समाज सेवेची आवड असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जनकल्याण प्रतिष्ठान मध्ये सामील व्हावे असे आवाहन सुरेश पद्मशाली व शिवरामजी कुमरे यांनी केले आहे.
