जाहिरात
गडचिरोली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा

खासदार डॉ. नामदेव किरसान यांची पत्रकार परिषद

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२२ डिसेंबर)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भर संसदेत आक्षेपार्ह विधान करून त्यांचा घोर अपमान केलेला आहे. त्या वक्तव्याचा निषेध करून केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सर्किट हाऊस कॉम्प्लेक्स येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेतुन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा लढा अधिक तीव्र करण्याकरिता जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर विविध मोर्चे व धरणे आंदोलन काढून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राजीनामा देत नाही तोपर्यंत विरोध प्रदर्शन सुरू राहील अशी माहिती सुद्धा खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी यावेळी दिली.

काँग्रेस पक्षासोबत असलेल्या मित्र पक्षांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. परंतु मोदी सरकार डॉ.आंबेडकरांचा अपमान झाला हे मान्य करायलाच तयार नाही. भारतीय संविधान अबाधीत रहावे व देश संविधानानुसारच चालावा हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे सुद्धा त्यांनी याप्रसंगी सांगितले.

आज झालेल्या पत्रकार परिषदेला खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे सह जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, वामनराव सावसाकडे, मिलिंद खोब्रागडे तालुका अध्यक्ष आरमोरी, सतीश विधाते शहर अध्यक्ष, रमेश चौधरी माजी नगरसेवक, जावेद खान, रुपेश टिकले, प्रभाकर वासेकर, दामदेव मंडलवार, सुरज धाईत, दत्तात्रय खरवडे, वसंता राऊत यांचे सह अनेक सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला हजर होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button