जाहिरात
देसाईगंज/वडसा

एकलपूर येथे ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन १४ ऑक्टोंबर साजरा

Spread the love

गडचिरोली/वडसा(दि,१५ ऑक्टोंबर)

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जनार्दन ताकसांडे जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा हे होते . प्रमुख मार्गदर्शक भोजराज कानेकर तालुकाध्यक्ष, प्रमोद राऊत तालुका सचिव तसेच विजय हेडाऊ वडसा हे होते. या दिनानिमित्त गावामध्ये फेरी काढून वेगवेगळे नारे देण्यात आले. त्यानंतर पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले . या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गावातील सर्व बहुजन लोक एकत्र जमले व पंचशील झेंड्याचा मानवंदना दिली. जनार्दन ताकसांडे अध्यक्षीय मार्गदर्शनात मनाले की , बुद्ध धम्म हा समानतेवर आधारित आहे . या धम्मात कोणीही उच्च किंवा नीच नाही. या धम्मात जाती नाहीत . सर्व मानव जातीला प्रेम व बंधुभावाने जगण्याचा अधिकार आहे. बुद्धाने धम्म प्रवचनात सांगितले की , चरथं भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय , अत्तानु कंपाय, लोकांनु हिताय, आदी कल्याण ,मध्य कल्याण ,अंत कल्याण अशाप्रकारे धम्म पटवून दिला.

यानंतर भोजराज कानेकर म्हणाले की , सम्राट अशोकाला बुद्धाच्या धम्म पटलात. त्यामुळे त्यांनी हातातील शस्त्र फेकून दिले आणि बुद्ध धम्माचा स्वीकार केला . यालाच विजयादशमी असे म्हणतात .बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना विदेशात पाठविले . आपल्याकडे असलेल्या धनाचा वापर करून ८४ हजार विहार बांधले .संपूर्ण भारत बौद्धमय केला. परंतु प्रतिक्रांतीने बुद्ध धम्म लयास गेला. तेव्हा पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म विजयादशमीच्या दिवशी स्वीकारून हा धम्म भारतात जिवंत केला .प्रमोद राऊत म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व धर्माच्या अभ्यास केला आणि त्यातून एकमेव बुद्ध धम्म स्वीकारला. त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला म्हणून आम्हीही स्वीकारले परंतु आमच्या विचारात परिवर्तन झाले नाही. त्यामुळे भारत बौद्धमय झाला नाही. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न अधुरेच राहिले. विजय हेडाऊ वडसा हे म्हणाले की, पंचशीलाचे पालन करणे कठीण नाही पण आपण भौतिक सुखाच्या आहारी गेल्यामुळे पंचशीलाचे पालन करत नाही .जर पंचशीलाचे पालन केले तर संपूर्ण जग दुःखमुक्त होऊ शकतो. असा बुद्धाचा धम्म दुःखमुक्तीच्या मार्ग आहे .परंतु या धम्माच्या मार्गाने चालत नाही आणि म्हणून दुःखमुक्त होत नाही .
या कार्यक्रमाला सरपंच संध्या नागमोशी , उपसरपंच विजय सहारे ,पंढरी कोडापे, रामजी संयम, मनोहर पुसाम, महादेव संयाम, वासुदेव दुपारे , दिलीप देशपांडे ,बाजीराव शेंडे, वनश्री भागडकर ,आनंदराव रामटेके, नरेश रामटेके ,विजय रामटेके ,विकास देशपांडे ,रूपचंद तलमले ,डाकराम दुपारे , दिलीप देशपांडे ,किरण रामटेके, विष्णू रामटेके , वसंता ठेंगरी, मनोहर ठेंगरी, नकटु उइके, लक्षमन वरखडे, जनार्दन पिलारे, सुधाकर कोचे, नेताजी दुपारे, मनोहर भागडकर,कुमोद कन्नाके ,भारती कोळवते , गावातील उपासक व उपासिका उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन ईश्वर रामटेके यांनी केले तर आभार कामराज लोखंडे यांनी मानले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button