जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू , रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ४ डिसेंबर)

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील चामोर्शी, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड तालुक्यासह अनेक गावांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. भूकंपाचे धक्के ७:२९ मिनिटांनी गडचिरोली शहरातील काही शहर वासियांनी सुद्धा जाणवले आहे.या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.

संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली ¶¶

अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button