जाहिरात
आपला जिल्हा

खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी घेतली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी विशेष आर्थिक पॅकेज ची मागणी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२ डिसेंबर)

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची दिल्ली येते संसद भवनाच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीत गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासाकरिता केंद्र सरकारने दहा हजार कोटीची मदत करावी अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या प्रसंगी केली.

गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र अतिदुर्गम व मागास क्षेत्र असल्याने लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्याप पायाभूत सुविधाचा विकास झालेला नाही, बऱ्याच गावात रस्ते, वीज, आरोग्य केंद्र नाही, त्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागतो.

लोकसभा क्षेत्रात रोजगाराचे कोणतेही मोठे साधन नसल्याने लोकसभा क्षेत्रात बेरोजगारीचेही प्रमाण वाढत आहे, अश्या परिस्थिती गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीन विकासासाठी व लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या समस्याच्या निराकरणा करीता केंद्र शासनाच्या वतीने किमान १० हजार कोटी रुपयाच्या आर्थिक पॅकेज ची मदत करावी अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी या भेटी दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे केली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button