जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

५ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

गडचिरोली जिल्हा निरीक्षक आमदार अभिजीत वंजारी, खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे घेणार मुलाखत

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,३ ऑक्टोबर)

आगामी विधानसभा २०२४ निवडणूकीच्या अनुषंगाने काँग्रेस ने जोमात तयारी सुरु केली असून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लडविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक आमदार अभिजीत वंजारी, खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून ५ ऑक्टोबर २०२४ रोजी, शासकीय विश्राम भवन, गडचिरोली येते सकाळी ११ वाजता पासून, गडचिरोली विधानसभा सकाळी ११ ते १२ वाजता, आरमोरी विधानसभा दुपारी १२ ते १ वाजता, अहेरी विधानसभा दुपारी १ ते २ वाजता पर्यंत मुलाखती पार पडतील.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button