जाहिरात
आपला जिल्हाराजकीय

जन्मभूमीला कर्मभूमी करण्याची संधी द्या : उषा धुर्वे

रोजगार व स्थानिक प्रश्नांना प्राधान्य

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२६ सप्टेंबर)

माझा जन्म गडचिरोलीच्या मातीत झालेला असून मला आता गडचिरोलीतील लोकांसाठी समाज कार्य व युवकांचे, महिलांचे तसेच वंचितांचे कामे करायची आहेत त्यामुळे मला आता जन्मभूमीला कर्मभूमी करण्याची संधी द्यावी असे आवाहन इंदिरा गांधी चौकातील गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या वतीने आयोजित रेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषदेतून काँग्रेसच्या महिला आदिवासी प्रदेशाध्यक्ष उषा धुर्वे यांनी केला आहे.या पत्रकार परिषदेला पुष्पा बिके उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात समस्या आहेत या समस्या मागील दहा वषार्पासून भाजपा सरकार सोडू शकलेले नाही उलट भ्रष्टाचार करून गोरगरीब जनतेची दिशाभूल करून फक्त आणि फक्त आश्वासने देण्याचे काम भाजपा सरकार करत आहे असा गंभीर आरोप देखील यावेळी पत्रकार परिषदेतून उषा धुर्वे यांनी केला .

मी गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरिता काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाने जर मला तिकीट दिली तर गडचिरोली विधानसभेतील रोजगार शिक्षण ,आरोग्य,शेतकऱ्यांच्या समस्या तसेच वन्य प्राण्यांपासून गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील होणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान व शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्याचे बळी या समस्येला देखील मी वाचा फोडण्याचे काम करणार असून कोनसारी प्रकल्पात शेतकऱ्याकडून घेतलेल्या जमिनी धारकांना अद्यापही कोणत्याही प्रकल्पात नोकरी मिळालेले नाही अशा लोकांना नोकरी देण्याचे काम देखील मी प्रथम करणार आहे.

गडचिरोली शहरात मोठे उच्चशिक्षित कॉलेज उभारणीचे देखील माझा हेतू आहे तसेच आरोग्यात व सिंचनावर माझे भर राहणार आहे जेणेकरून बळीराजा सुखावला तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व लोक सुजलाम सुफलाम होतील असे माझे मत आहे असेही यावेळी पत्रकार परिषदेतून उषा धुर्वे यांनी व्यक्त केले.

विधानसभा क्षेत्रातील युवकांना व महिलांना विशेष करून रोजगार देण्याकरिता आपण अहोरात्र प्रयत्न करणार असून विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण करून देणार अशी गवाई देखील यावेळी त्यांनी दिली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button