जाहिरात
गडचिरोली

गडचिरोली: चौकातील होर्डिंग जि. प. प्रशासनाने काढले

कारवाई विरोधात होर्डिंग मालकांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२१ सप्टेंबर)

गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनाच्या आवारात लावलेले होर्डींग जिल्हा परिषद प्रशासन उपविभाग बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात आले.

ही कारवाई करतांना होर्डिंग चे लहान लहान तुकडे करून टाकल्याने चारही होर्डींग मालकांचे प्रत्येकी पाच लाख प्रमाणे जवळपास वीस लाखांचे नुकसान या कारवाई मुळे झाले आहे.तसेच ही कारवाई करतांना नगर पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर सुध्दा फाडून टाकण्याचे कामही जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

होर्डींग बळजबरीने काढणे व त्या करीता घरगुती गॅस सिलेंडर चे वापर करणे चुकीचे असल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विरोधात पोलिस तक्रार करण्यात येणार असल्याचे तसेच ही कारवाई करण्यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने जमा केलेली अनामत रक्कमही परत न देता,ह्या कारवाई ची होर्डींग मालकांना कोणतीही लिखित स्वरूपात माहिती देण्यात आली नव्हती. सदर कारवाई च्या विरोधात न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार असल्याचेही होर्डिंग मालकांनी सांगितले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button