जाहिरात
गडचिरोलीविशेष

गडचिरोली: वातानुकूलित सिनेमागृहाला शुभारंभाचा मुहूर्त मिळेना

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२८ ऑगष्ट)

गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील स्वराज्य हेल्थ क्लब च्या बाजूला लाखो रुपये खर्चून तयार होत असलेल्या हवा भरलेल्या वातानुकूलित सिनेमागृहाला शुभारंभाचा अजूनही मुहूर्त मिळालेला नाही त्यामुळे त्याचा शुभारंभ मुहूर्त किती दिवस लांबणीवर जातो हे पाहण्याजोगे आहे.सिनेमगृहाचा शुभारंभ लांबणीवर गेल्याने सिनेमा रसिकांची नक्कीच नाराजी आहे.

(वातानुकूलित सिनेमागृह आतून सुसज्ज)

गडचिरोली शहरात एकमेव भव्य अशा वातानुकूलित सिनेमागृहामध्ये दर्शकांची संख्या जवळपास १२० दर्शकांची असणार आहे. सिनेमागृहाच्या बाजूला भव्य चारचाकी व दुचाकी वाहनासाठी पार्किंगची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे.

गडचिरोली शहरात पूर्वीपासूनच दोन सिनेमागृह आहेत पण दर्शकाच्या नाराजीमुळे त्या सिनेमागृहाकडे दर्शकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळेच नगरपरिषद प्रशासन सुरू करत असलेल्या सिनेमागृहात लोक किती पसंती देतात हे पाहण्यासारखे आहे गडचिरोली ची जनता वातानुकूलित अशा भव्य सिनेमागृहात सिनेमा पाहण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.

(पडलेल्या संरक्षण भिंतीचे पुनर्बांधणीचे काम असल्याने मुहूर्त लांबणीवर)

नगर परिषदेच्या जागेवर भव्य असा वातानुकूलित सिनेमागृह साकारला आहे त्या सिनेमागृहाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे पण सिनेमगृहाच्या मागील बाजूला असलेल्या संरक्षक भिंत अति पावसामुळे खचल्याने त्या संरक्षण भिंतीचे पुनर्बांधणीचे काम पुन्हा केले जात असून लवकरच थिएटर सुरू होत असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने कळवली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button