जाहिरात
आपला जिल्हा

जर्मनीत युवक-युवतींना नोकरीची संधी

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून अर्ज आमंत्रित, पत्रकार परिषदेतून दिली माहिती

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२१ ऑगष्ट)

महाराष्ट्र राज्य शासन व जर्मनी यांच्या झालेल्या करारानुसार जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास विविध क्षेत्रातील ३० ट्रेडसमधील १० हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील १५० ते २५० उमेदवारांना ४ महिने जर्मन भाषा व शिष्टाचार तसेच आवश्यकतेनुसार कौशल्यवृध्दीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.अशी माहिती डायटचे प्राचार्य धनंजय चापले यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, डॉ. विनीत मस्के, गुलाबराव राठोड हे उपस्थित होते.

अर्ज करण्यासाठी वेबसाईट
¶¶¶
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत कौशल्यधारक उमेदवारांकडून www.ac.in/GermanyEmployment या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

जर्मनीत खालील प्रकारच्या रोजगाराच्या संधी
¶¶¶
आरोग्य सेवेतील परिचारिका, वैद्यकीय सहायक, प्रयोगशाळा, रेडियोलॉजी, दंतशल्य सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रुषा सेवक, फिजिओथेरपीस्ट, दस्तऐवजीकरण आणि संकेतीकरण,लेखा व प्रशासन, आतिथ्य सेवांमधील वेटर्स, सर्व्हर्स, स्वागत कक्ष संचालक, रिसेप्शनिस्ट, आचारी, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, हाऊसकिपर, क्लीनर, स्थापत्य सेवांमधील विद्युततंत्री, नविनीकरण उर्जेमधील विशेष विद्युततंत्री, औष्णिक विजतंत्री, रंगारी, सुतार, वीट/फरशी करिता गवंडी, प्लंबर्स, नळ जाडारी, वाहनाची दुरूस्ती करणारे मेकॅनिक, यासोबतच वाहन चालक (बस, ट्राम, ट्रेन, ट्रक), सुरक्षा रक्षक, टपाल सेवा वितरक, सामान बांधणी व वाहतूक करणारे (पॅकर्स व मुव्हर्स), विमानतळावरील सहायक, स्वच्छताकर्मी, सामान हाताळणारे, हाऊसकीपर, विक्री सहाय्यक, गोदाम सहायक इत्यादी क्षेत्रातील कौशल्यधारकांची निवड केल्या जाणार आहे.

जिल्हयातील पात्र विद्यार्थी / विद्यार्थिनींना खालील सेंटर वर मिळेल जर्मनी भाषेचे प्रशिक्षण
¶¶¶
१) जे. टी.पाटील अध्यापक विद्यालय,धानोरा रोड, २)शिवाजी हायस्कूल गोकुळ नगर,
३)विद्याभारती कन्या विद्यालय, ४)संत गाडगे महाराज विद्यालय, ५)साईनाथ अध्यापक विद्यालय मुरखडा या पाच ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षण देण्याकरिता विहित अे-1, अे-2, बी-1, बी-2, सी-1, सी-2 परिक्षा उत्तीर्ण इच्छुक शिक्षकांनी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7 या लिंकद्वारे गुगल फॉर्मवर अर्ज करावे, आवश्यकतेनुसार त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button