जाहिरात
रणधुमाळी

गडचिरोली : प्रभाग क्र.५ ब सर्वसाधारण पुरुष प्रवर्ग भाजपाचे प्रकाश वसंत निकुरे व शिवसेनेचे नितेश (बंटी) प्रमोद खडसे यांच्यात दुहेरी लढत

काँग्रेस उमेदवार समाज बांधवांच्या मतांच्या भरोश्यावर

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.२८ नोव्हेंबर)

नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून गडचिरोली प्रभाग क्र. ५ ब सर्वसाधारण पुरुष प्रवर्ग मधुन उमेदवारी मिळालेल्या प्रकाश वसंत निकुरे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांचे कडुन उमेदवारी मिळालेले नितेश (बंटी) प्रमोद खडसे हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढत आहेत.या दोन उमेदवारात नगरसेवक पदासाठी दुहेरी लढत रंगतदार होणार असे स्पष्ट दिसत आहे.

वार्डातील मतदार राजाच्या भेटीगाठी घेण्यासाठी दोन्ही उमेदवाराची चांगलीच दमछाक वाढलेली दिसून येत आहे. गडचिरोली प्रभाग क्रमांक ५ मधील मतदार २ तारखेला मतदानातून मतदार राजा कोणत्या उमेदवाराला अधिक पसंती देतात हे पाहण्याजोगे आहे.

भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी मिळालेले प्रकाश वसंत निकुरे हे मागील निवडणुकीत पराभूत झाले आहेत पण यावर्षी विजय आपलाच असल्याची ते आपल्या प्रचारातून दाखवून देत आहेत. घराघरात पोहचून आपला आपला प्रचार करत आहेत. सोबतच त्यांचे विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार बंटी खडसे हे सुद्धा नवखे उमेदवार असून घराघरात जाऊन आपल्याला जनतेने निवडून द्यावे अशी विनवणी करत आहेत.

नगरपालिकाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय मैदान गरम झालेले असुन निवडणुकीत विजय आपलाच असल्याची खात्री करून उमेदवार आपापल्या प्रचाराला लागले आहेत.उमेदवाराकडून महिलांना साड्यांचे वाटप, कॅलेंडर वाटप व शिवाय अन्नदान करून मतदारांना आकर्षित करण्याचे काम करीत आहे.

काँग्रेस उमेदवार समाज बांधवांच्या मतांच्या भरोश्यावर
!!!
मागील निवडणुकीत प्रभाग ५ मध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले होते. निवडून आल्यानंतर त्या उमेदवाराचे प्रभागात जनतेला दर्शनही दुर्लभ झाले होते. लोकशाही न्युज ने केलेल्या प्रभागातील सर्वे मध्ये त्या काँग्रेस उमेदवारा प्रती या निवडणुकीत प्रभागातील मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पण या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार केवळ समाज बांधवांच्या मताच्या भरोश्यावर निवडून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे प्रभागातील जानकार (राजकीय विश्लेषक) मतदारांचे मत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button