जाहिरात
दैनंदिन बातम्या

मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आदिवासी जनतेत विविध योजनांची जनजागृती

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२७ जुलै)

मानवाधिकार एवं महिला बाल विकास संघटनेचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अर्जुन पटेल आणि महाराष्ट्र राज्य सचिव गडचिरोली जिल्हा चे राहुल बालपांडे आणि तालुका अध्यक्ष सुभाष भुरसे, चामोर्शी तालुका अध्यक्ष विनोद बुरांडे यांनी मंगळवार दि, २५ जुलै २०२३ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत सावेला अंतर्गत येणारा सुईमारा अतिदुर्ग विकासापासून दूर असलेल्या गावांमध्ये जाऊन आदिवासी आणि युवावर्गाला व्यसन मुक्ती संदर्भात मार्गदर्शन व आदिवासी आणि वयोवृद्ध लोकांना पेन्शन बद्दल माहिती दिली.

(मानवाधिकार संघटनेमार्फत विविध योजनांची जनजागृती करताना पदाधिकारी)

मानवाधिकाराच्या संदर्भातील गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आणि आदिवासी बांधवांना आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवा व शिक्षणापासून आपल्या पाल्यांना वंचित ठेवू नका असे सांगण्यात आले. महिला संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच आदिवासी लोकांमध्ये बालविवाह संबंधित माहिती देऊन त्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी लोकांमध्ये कला , कौशल्य आणि संगीत टिकून राहण्यासाठी मार्गदर्शन केले आणि आदिवासी समाज बांधव कला विकसित करून केंद्र आणि राज्य सरकार योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना त्यासंबंधित योजनेची माहीत करून देण्यात आली तसेच अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या योजना संबंधित माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाने महिलांना एसटी तून प्रवास करण्यासाठी ५०% सूट दिली आहे. आदिवासी लोकांना वनहक्क संदर्भात माहिती दिली तसेच आरोग्यविषयक माहिती दिली आणि आदिवसी समाजामध्ये कुपोषणाचे प्रमाण असून तेथील बालक आणि मातांना सुरक्षित मातृत्व योजनेबद्दल माहिती दिली. तसेच ग्राहक संरक्षण कायद्या संदर्भात माहिती करून दिली आणि गावातील नागरिकांनी अनेक समस्यांची माहिती करून दिली. याप्रसंगी मधुकर गोटा, प्रसन्न एक्का, लालांजी किंडो, दामजी गोटा, निखिल गोटा, निता गोटा, गिरजाबाई गोटा, सूनमुनीबाई केरेकांता तसेच गावातील अन्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button