जाहिरात
आरोग्य

१५ मे रोजी ‘सर्च’ रुग्णालयात ‘सिकलसेल ओपीडी’

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,६ मे)

धानोरा तालुक्यातील चातगाव स्थित ‘सर्च’ रुग्णालयात आय.सी.एम.आर सिकलसेल टीम चंद्रपुर व सर्च यांच्या सहकार्याने सर्च रुग्णालय चातगाव येथे सिकलसेल ओपीडीचे नियोजन करण्यात आले आहे.

या महिन्याला १५ मे २०२३ रोज सोमवारला सर्च रुग्णालयात ओपीडी घेण्यात येणार असून, डॉ. कल्पिता गावित व त्यांची टीम या ओपीडीसाठी उपस्थित राहतील.

चालू वर्षात १५ मे २०२३, १४ जून २०२३, १२ जुलै २०२३, १६ ऑगस्ट २०२३, १३ सप्टेंबर २०२३, १८ ऑक्टोबर २०२३, १५ नोव्हेंबर २०२३ आणि १३ डिसेंबर २०२३ या तारखेला सिकलसेल ओपीडीचे नियोजन केले आहे.

सिकलसेल आजार हा अंनुवांशिक आजार आहे. यात आई व वडील दोघेही सिकलसेल रुग्ण किवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्याना हा आजार होऊ शकतो. आजाराची माहिती, लक्षणे व रुग्णांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन तसेच सिकलसेल आजारा संबंधित होणार्‍या प्रयोगशाळा तपासणी व औषधोपचार मोफत होतील. Folic acid, Hydroxyurea आणि इतर आवश्यक औषधी मोफत दिल्या जाईल.

काळाची गरज समजून चातगाव येथील ‘सर्च’ रुग्णालयात सिकलसेल ओपीडी ला सुरुवात करण्यात आली आहे. १५ मे २०२३ या दिवशी ‘सर्च’ मध्ये सिकलसेल ओपीडी घेण्यात येणार असून सिकलसेल आजाराने त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘सर्च ‘कडून करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button