जाहिरात
आपला जिल्हा

वनहक्क व लाल पट्ट्यातील शेतीचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या सुरजागड लॉयडस मेटल कंपनीची चौकशी करा

अन्यथा आंदोलन,योगाजी कुडवे यांचा पत्रकार परिषदेतुन इशारा

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ ऑगष्ट)

सुरजागड लॉडस मेटल कंपनी स्वतःचा अस्थित्व निर्माण करण्यासाठी मौजा हेडरी, बांडे, परसालगोंदी लागून असलेल्या अनेक गावातील आदिवासीं समाज बांधवाच्या शेतीचा बेकायदेशीरपणे वापर करीत आहे. त्याची चौकशी करावी व सदर कंपनी विरोधात गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे जिल्हाधिकारी कार्यालया समोर येत्या २० ऑगष्ट पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती आज इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

एटापल्ली तालुक्यातील महसूल विभागावरही गुन्हा नोंद करा
¶¶¶
संबंधित महसूल अधिकारी व कर्मचारी हे कुठलिही कार्यवाही करताना दिसून येत नाही. अधिकारी कर्मचारी हे बघ्याची भूमिका घेतले असल्याने कंपनी सोबत महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने असले काम करून घेत आहेत. त्यामुळे सदर शेतजमीन ही आदिवासी लोकांची मालकी हक्काची जागा असून त्यावर होणाऱ्या अतिक्रमणासाठी जबाबदार महसूल विभागातील दोषींवर गुन्हा नोंद करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली.

माझा उद्योगाला विरोध नाही पण लॉयड र्मेटल कंपनीने नियमानुसार कायदेशीर आपली कामे करावी असे सुद्धा त्यांनी सांगितले, आदिवासींना शासनामार्फत वाटप झालेल्या जागेवरही अतिक्रमण केल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.

 

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button