डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

लोकशाही न्यूज गडचिरोली (दि,३० जुलै)
डॉ. मिलींद नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्य मित्र परिवारांच्या वतीने उद्या ३० जुलै रोजी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७:३० वाजता स्मृती व्हॉलीबॉल क्लब मध्ये वृक्षारोपण, सकाळी ९ वाजता धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात फळवाट, सकाळी ११ वाजता महिला व बाल रूग्यालयात नवजात शिशुंना आवश्यक साहित्य वाटप, दुपारी १२:१५ वाजता मातोश्री वृध्दाश्रमात वस्त्रदान, दुपारी १२:३० वाजता सेमाना देवस्थान येथे दर्शन व महाप्रसाद वितरण, दुपारी १ वाजता मुरखळा व नवेगाव जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक व संगीत साहित्य वाटप, त्याचबरोबर चामोर्शी, तळोधी, आष्टी येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके व मित्र परिवारांच्या वतीने करण्यात आले आहे.
