जाहिरात
आपला जिल्हा

पुरबाधित शेतीची तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली पाहणी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (२७ जुलै)

मागील आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज भर पावसात गडचिरोली तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

तनुश्री आत्राम यांनी येवली येथील तलाठी श्री.वासनिक यांच्यासमवेत येवली, गोविंदपूर, दर्शनी इत्यादी गावांना भेट देऊन पुराने बाधित शेतीची पाहणी केली. शिवाय मुडझा येथील तलावाची पाळ फुटल्याने शेती आणि मच्छिमार समाजाचे मोठे नुकसान झाले. तनुश्री आत्राम यांनी या तलावाचीही पाहणी केली. शिवाय नुकसानग्रस्त शेतकरी आणि मच्छिमार बांधवांशी चर्चा केली. शासनाने तत्काळ पूरबाधित शेती आणि घरांचे सर्वेक्षण करुन पीडित नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तनुश्री आत्राम यांनी प्रशासनाकडे केली आहे.

जिल्हा परिषद वाकडीच्या शाळेत वृक्षारोपण
¶¶¶
पूरग्रस्त भागाची पाहणी करता करता तनुश्री आत्राम वाकडी गावात पोहचल्या. यावेळी त्यांनी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण केले. याप्रसंगी शिक्षकवृंद आणि नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button