जाहिरात
आपला जिल्हा

तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यातर्फे पोलिस भरतीच्या उमेदवारांच्या जेवणाची व निवाऱ्याची व्यवस्था

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली(२७ जुलै)

रविवारी २८ जुलैला गडचिरोली येथे  ९१२ जागांसाठी पोलिस भरतीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली शहरात ठिकठिकाणी मोफत निवास आणि भोजनाची सोय केली आहे.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात तनुश्री आत्राम आणि सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या ठिकाणी जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली आहे.                                                             ¶¶¶                                                                     नवेगाव कॉम्प्लेक्स येथील सृष्टी सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथील पटेल मंगल कार्यालय व इंदिरानगर येथील स्पप्नील मडावी अकॅडमी येथे ही व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क                               ¶¶¶                                                                     लेखी परिक्षेसाठी येणाऱ्या युवक, युवतींनी तनुश्री आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालय(8275877177), स्वप्नील मडावी(9529933893), उमेश उईके(8999956573), कुणाल कोवे(9284658547),सतीश कुसराम(7498462079) तसेच जयश्री येरमे व रेखा तोडासे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तनुश्री आत्राम यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button